The GD News

Breakfast : सकाळचा नाश्ता खरंच इतका महत्त्वाचा आहे का? जाणून घ्या सत्य!

Breakfast : जर मोठ्यांनी नाश्ता नाही केला तरी काही फरक पडत नाही. पण मुलांसाठी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,

आपल्यापैकी अनेक जण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की, सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार असतो.पण आता एका नवीन संशोधनात नाश्त्याबाबत समोर आला आहे की, संशोधनात आढळले की नाश्ता करणारे आणि न करणारे यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेत फारसा फरक नसतो.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंदूला ऊर्जा ग्लुकोज आणि शरीरातील फॅटमधून मिळते.जेव्हा आपण बराच वेळ काही खात नाही, तेव्हा शरीर केटोन्स नावाचे घटक तयार करतं.

हे घटक मेंदूला नीट कार्य करण्यासाठी ऊर्जा पुरवतात. काही तास उपवास केल्यानेही मेंदूच्या कार्यावर काही परिणाम होत नाही.जर 8, 12 किंवा 16 तास उपवास केला तर मेंदूसाठी सुरक्षित मानलं जातं.जर काही वेळासाठी अन्न नाही खाल्लं तर तुमच्या शरीर आणि मेंदूवर कोणताही वाईट परिणाम होऊ शकत नाही.संशोधनात हेही सांगितले आहे की, मोठ्यांनी नाश्ता न केल्याने काही फरक पडत नाही. पण मुलांसाठी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे.मुलं वाढीच्या टप्प्यात असतात, त्यामुळे त्यांना पौष्टिक नाश्ता हवा असतो. यामुळे त्यांचे शरीर आणि मेंदू दोन्ही मजबूत राहतात.

प्रौढ व्यक्तींनी कधी कधी नाश्ता चुकवला तरी काळजीची गरज नाही. त्यांचे शरीर आणि मेंदू या बदलाशी सहज जुळवून घेतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top