The GD News

Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: सुनील शेट्टीनं जावई, लेकासोबत सुरू केलाय नवा बिझनेस; महिलांसाठी उपयुक्त वस्तू केलीय लॉन्च

Suniel Shetty Invests In Excelmoto Electric Mobility: बॉलिवूड (Bollywood News) असो वा, ओटीटी (OTT Platform) सगळीकडे सध्या अण्णाच्याच नावाची चर्चा आहे. पण, तुम्हाला माहितीय का? बॉलिवूडचा अण्णा म्हणजेच, सुनील शेट्टी (Suniel Shetty) एक व्यावसायिक म्हणूनही तितकाच प्रसिद्ध आहे. इंडस्ट्रीसोबतच व्यावसायिक जगतातही सुनील शेट्टी आपलं वर्चस्व टिकवून आहे. बॉलिवूडचा अॅक्शन मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील शेट्टीनं आता व्यावसायिक जगतात आणखी एक पाऊल ठेवलं आहे. सुनील शेट्टीनं त्याचा मुलगा अहान शेट्टी आणि जावई राहुलसोबत EXELmoto मध्ये गुंतवणूक केली आहे. सुनील शेट्टीनं ज्यामध्ये गुंतवणूक केलीय, ती नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक मोबिलिटी बैंड एक्सेलमोटोमध्ये गुंतवणूक केली आहे.  

सुनील शेट्टी समर्थित एक्सेलमीटीनं अलिकडेच डिलिव्हरी इंडिया लिमिटेडसोबत भागीदारी करत व्यावसायिक विभागाची घोषणा केली आहे. याचसोबत कंपनीनं ‘स्कूट’ नावाची नवी इलेक्ट्रिक सायकल लाँच केली.  

आपल्या नव्या बिझनेसबाबत बोलताना सुनिल शेट्टी म्हणाला की, “ही संधी माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप मोठी होती, पण त्याहूनही अधिक म्हणजे, आपल्या देशाला स्वच्छ, स्मार्ट आणि अधिक शाश्वत बनवणाऱ्या या बदलाचा भाग असणं. प्रत्येकजण हेच करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा ही संधी अक्षय (संस्थापक आणि सीईओ, एक्सेलमोटो) आणि आमच्या कुटुंबासह – अहान आणि के. एल. राहुल – सोबत आली, तेव्हा आम्ही ती सोडू शकलो नाही…”

“EXELmoto दिसायला छान दिसते, ती चालवतानाही मज्जा येते… हेच महत्त्वाचं आहे. माझ्या पिढीसाठी, हार्ले डेव्हिडसन किंवा बुलेटपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच वाटायचं नाही. पण आता, तीच  हार्ले डेविडसन फारच जड वाटते, भारतीय मोटारसायकली जड वाटतात आणि आजही, बुलेट जड वाटते… EXELmoto ई-सायकल अशी आहे जी, मला सहज चालवता येते… ती हलकी, मजेशीर वाटते…”, असं सुनील शेट्टी म्हणाला. 

सुनील शेट्टीनं लॉन्च केली इलेक्ट्रिक सायकल

सुनील शेट्टीनं ‘स्कूट’ इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. ज्यात स्कूटर स्टाईल डिझाइनसह पेडल असिस्ट आणि आरामदायी बेंच सीट आहे. हे उत्पादन विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलं आहे, जे स्वातंत्र्य, सुविधा आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देतं. परवाना आणि नोंदणीशिवाय उपलब्ध असलेलं ‘स्कूट’ हे भारताच्या निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी एक सक्रिय आणि सुलभ मायक्रो मोबिलिटी उपक्रम आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top