The GD News

Bajar Bhav2गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकऱ्यांचं थेट दिल्लीत आंदोलन, खासदार अमोल कोल्हेंची सरकारवर टीकाBajar Bhav2

सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पडणाऱ्या दरामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे.

Onion News:  सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पडणाऱ्या दरामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे. कांदा निर्यात धोरणातील धरसोडपणामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देखील मिळाला नाही. या परिस्थितीमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांनी आज दिल्ली येथे खांद्यावर कांद्याची पिशवी आणि गळ्यात कांद्याच्या माळा घालून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करीत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांची फरफट, अमोल कोल्हेंची टीका

या आंदोलनात शिरुर तालुक्यातील सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मचाले आणि नवनाथ फराटे आदी शेतकरी बांधव सहभागी झाले. कृषी, वाणिज्य तथा प्रधानमंत्री कार्यालय या ठिकाणी या शेतकऱ्यांनी आपला आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा आक्रोश आहे. या पीकाच्या संदर्भाने गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांची जी ससेहोलपट होतेय, ती संपूर्ण देश पाहतोय अशे मत कोल्हे यांनी व्यक्त केले. याबाबत संसदेत मी स्वतः अनेकदा भूमिका मांडून शेतकऱ्यांचे म्हणणे शासनापुढे मांडले आहे. आपल्या मतदारसंघातील शेतकरी बांधवांनी आज जी आंदोलनाची भूमिका घेतली ही एका उद्वेगातून आलेली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घ्यावी. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांची जी फरफट चाललेली आहे ती कोणत्याही परिस्थितीत थांबलीच पाहिजे ही आमची ठाम भूमिका असल्याचे कोल्हे म्हणाले. 

कांद्याच्या दरात सातत्याने घसरण

कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून कांदा दर वाढीची मागणी केली जात आहे. मात्र शासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. कांदा उत्पादनासाठी झालेला उत्पादन खर्च देखिल वसूल होत नाही. इतकेच नाही तर कांद्याच्या दरात वाढ होईल; या आशेने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवणूक करून ठेवला आहे. मात्र हा कांदा देखील किती दिवस साठवून ठेवायचा असा प्रश्न देखील आहे. दरम्यान दरवाढीच्या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करण्याची शक्यता आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top