The GD News

16 महिन्यांपासून प्रेग्नंट बनवून ठेवलंय!’, सोनाक्षी सिन्हा प्रेग्नन्सीच्या खबरांवर स्पष्टच म्हणाली.. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये…

Sonakshi Sinha: बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण तिच्या प्रेग्नन्सीच्या बातम्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर गाजत आहेत. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावताना सोनाक्षी या अफवांबद्दल आणि आपल्या फिटनेस जर्नीबद्दल मोकळेपणाने बोलली. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमच चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून ती प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेचा विषय बनली होती.

16 महिन्यांपासून प्रेग्नंट बनवून ठेवलंय!

सोनाक्षीने मजेशीर अंदाजात सांगितलं, “मला लोकांनी 16 महिन्यांपासून प्रेग्नंट बनवून ठेवलंय! माझं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी मी आणि जाहिर हॉस्पिटलमध्ये माझ्या बाबांना भेटायला गेलो. तिथून बाहेर येताना आमचा फोटो घेतला गेला आणि दुसऱ्याच दिवशी बातमी आली की मी प्रेग्नंट आहे! खरं सांगायचं तर, जेव्हा मी खरोखरच प्रेग्नंट असेन तेव्हा सगळ्यांना दिसेल. लपवून ठेवायचं काही नाही.”

वजनाबाबतीत कायमच करावं लागलंय स्ट्रगल 

तिने पुढे सांगितलं की ती नेहमीच वजनाच्या बाबतीत स्ट्रगल करत आली आहे. “मी लहानपणापासूनच ओव्हरवेट होते. 18 वर्षांची असताना मी ट्रेडमिलवर 30 सेकंदसुद्धा धावू शकत नव्हते. पण मग मी ठरवलं बस, आता बदलायचं! मी जिमला जायला सुरुवात केली, कार्डिओ, वेट ट्रेनिंग, योगा, पिलाटेस सगळं ट्राय केलं. वजन कमी करायला मला तब्बल दोन-दीड वर्ष लागले.”

तिने स्पष्ट सांगितलं की वजन कमी करणं अवघड असतं, पण ते टिकवून ठेवणं त्याहून कठीण आहे. “मला खाण्याची खूप आवड आहे, त्यामुळे हे सगळं सांभाळणं आव्हानात्मक असतं. पण मी हे फक्त स्वतःसाठी नाही, तर इतर मुलींसाठी करतेय. मी त्यांच्यासाठी रोल मॉडेल व्हावं असं मला वाटतं. कारण मी मोठी होत असताना माझ्याकडे असं कोणी प्रेरणा देणारं नव्हतं. आजकाल थोडं वजन वाढलं की लोक लगेच प्रेग्नंट म्हणतात,” असं सोनाक्षीने सांगितलं. सध्या सोनाक्षी सिन्हा ‘हीरमंडी’नंतरच्या तिच्या पुढील प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे आणि चाहत्यांशी अशा खुल्या गप्पांमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

सोनाक्षी आणि झहीरचं लग्न

सोनाक्षी सिन्हाने जून 2024 मध्ये तिने झहीर इक्बालशी लग्न केले. त्या आधी त्यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा रंगली होती. सोनाक्षीचा लग्नसोहळा अत्यंत खाजगी पद्धतीने पार पडला. त्यांनी त्यांच्या घरी रजिस्टर मॅरेज केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी सोनाक्षीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. लग्नानंतर त्यांनी एक भव्य रिसेप्शन ठेवलं होतं. या रिसेप्शनला अनेक मोठे सेलिब्रिटी, राजकारणी आणि उद्योगपती उपस्थित होते. लग्नानंतर सोनाक्षी अनेक वेळा झहीर इक्बालसोबत परदेशात फिरत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top