The GD News

Pranav Mohanlal South Film Diés Iraé Movie Review: 113 मिनिटांची फिल्म, 40 दिवस सुरू होती शूटिंग; सस्पेन्स अन् थ्रीलरचा पॉवरफुल डोस; पण, पाहण्यासाठी पूर्ण करावी लागेल एक अट, कोणती?

Pranav Mohanlal South Film Diés Iraé Movie Review: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) ‘बाहुबली द एपिक’ (Baahubali: The Epic) आणि ‘थामा’ (Thama) सारख्या बिग बजेट सिनेमे (Big Budget Movie) धुमाकूळ घालत आहेत. आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana), रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) ‘थामा’ 200 कोटींच्या दिशेनं वाटलाच करतोय. तर, ‘बाहुबली द एपिक’ 50 कोटी रुपयांची कमाई करण्याच्या तयारीत आहे. पण, यांच्यात आणखी एक सिनेमा गाजतोय आणि धमाकेदार कमाई करतोय. तो सिनेमा बॉलिवूडचा (Bollywood) नाही, साऊथचा (South Film) आहे. बरं हा सिनेमा बिग बजेट सिनेमा ‘थामा’लाही मागे टाकतोय. महत्त्वाचे म्हणजे, या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळालंय. म्हणजेच, हा सिनेमा फक्त 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे. दरम्यान, याचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर कोणताही परिणाम झाला नाही, या सिनेमानं 50 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे.  

आम्ही ज्या सिनेमाबाबत सांगतोय, तो एक हॉरर थ्रिलर सिनेमा (Horror Thriller Cinema) आहे. त्याचं नाव, ‘डाईज इराई’ (Diés Iraé). या सिनेमात साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा मुलगा प्रणव मोहनलाल मुख्य भूमिकेत दिसतोय. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) नं या सिनेमाला ‘ए’ सर्टिफिकेट दिलंय. प्रणव मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे. सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा यावर्षी हॅलोविनला थिएटरमध्ये रिलीज करण्यात आलेला. असं म्हटलं जातं की, या सिनेमाचं चित्रिकरण फक्त 40 दिवसांत पूर्ण झालंय

बॉक्स ऑफिसवर गाजतोय ‘हा’ सिनेमा 

‘डाईज इराई’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शबाबत बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी ‘डाईज इराई’नं 4.7 कोटींची ओपनिंग केलेली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 5.7 कोटींवर पोहोचलेला. तर, तिसऱ्या दिवशी फिल्मची कमाई 6.35 कोटींवर पोहोचली. चौथ्या दिवशी सिनेमानं तब्बल 3 कोटी कमावले. तर, पाचव्या दिवशी 2.6 कोटींचं कलेक्शन केलेलं. सहाव्या दिवशी हा आकडा 2.25 कोटींवर पोहोचला. यासोबतच फिल्मनं 24.60 कोटींची कमाई केलेली. तर, ‘डाईज इराई’चं बजेट फक्त 24 कोटींचं आहे. दरम्यान, हैराण करणारी बाब म्हणजे, ‘डाईज इराई’नं वर्ल्डवाईल्ड दुप्पट कमाई केली आहे. 

दरम्यान, सिनेमाच्या कहानीबाबत बोलायचं झालं तर, ट्रेलर पाहून कळतंय की, प्रणव एका कुटुंबाती एकुलता एक मुलगा आहे. या कुटुंबाला शेजारी-पाजारी शापित असल्याचं म्हणतात. तसेच, प्रणवलाही काही विचित्र आणि धक्कादायक गोष्टींचा अनुभव मिळतो. पण, कोणाला काही सांगू शकत नाही कारण त्याला भिती वाटत असते की, माझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top