तूप आणि तेल हे आपल्या रोजच्या स्वयंपाकातील महत्त्वाचे घटक आहेत. पण कधी तुम्हाला जाणवलंय का, काही दिवसांनी त्यांचा वास किंवा चव बदलते?
तूप आणि तेल आपल्या आहाराचा अविभाज्य भाग आहेत, पण ते खराब झालंय का हे अनेकांना ओळखता येत नाही.काही दिवसांनी तूप किंवा तेलाचा वास बदलायला लागतो.ताज्या तुपाचा सौम्य सुगंध आंबूस किंवा उग्र होतो, तर तेल जुना वास देऊ लागतं.त्याचप्रमाणे रंगही गडद होतो आणि टेक्स्चर घट्ट किंवा धूसर दिसू लागतं.
सर्वात स्पष्ट लक्षण म्हणजे चव तूप किंवा तेल खराब झालं की जेवणाला आंबटपणा किंवा विचित्र तिखट चव येते.अशी चिन्हं दिसताच ते वापरणं थांबवा, कारण खराब तेल-तूप शरीराला अपायकारक ठरू शकतं.योग्य साठवणूक म्हणजे थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या ठिकाणी, घट्ट झाकण लावून ठेवणं.
यामुळे तूप आणि तेल जास्त दिवस ताजं राहतं आणि त्याचं पौष्टिक मूल्यही टिकून राहतं.(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )